शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दाहिनी स्मशानभूमीत दाखल उद्यापासून जोडकाम सुरू ,जानेवारीपासून दाहिनी कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:44 IST

\कोल्हापूर : नेहमी प्रागतिक विचारसरणीचा स्वीकार करणाºया कोल्हापूर शहरात लवकरच येथील पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा वापर सुरू होणार

कोल्हापूर : नेहमी प्रागतिक विचारसरणीचा स्वीकार करणाºया कोल्हापूर शहरात लवकरच येथील पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा वापर सुरू होणार आहे. सध्याच्या प्रचलित शेणी व लाकडांच्या पारंपरिक पद्धतीमुळे अंत्यसंस्कारास लागणारा वेळ, होणारे प्रदूषण या गोष्टींचा विचार करून ही गॅसदाहिनी बसविण्यात येत असून, विशेष म्हणजे मूळचे कोल्हापूरचे असलेल्या परंतु व्यवसायाच्या निमित्ताने बडोद्यात स्थायिक झालेल्या राजेंद्र चव्हाण यांनी ही दाहिनी मोफत दिली आहे. उद्या, शुक्रवारपासून ही दाहिनी जोडण्याचे काम सुरू होणार आहे.कोल्हापूर शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा स्मशानभूमीत सुविधा कमी पडत आहेत. अपुरे बेड, पार्किंगची गैरसोय यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे विस्तारीकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. याबाबत स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्याचे आदेश आयुक्त अभिजित चौधरी यांनी नुकतेच दिले आहेत.गुजरात राज्यात सगळीकडे स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविल्या गेल्या आहेत. राजेंद्र चव्हाण यांचा बडोद्यात गॅस दाहिनी तयार करण्याचा कारखाना आहे. जवळपास २०० हून अधिक ठिकाणी त्यांनी गॅस दाहिन्या बसविल्या असून त्या उत्तमप्रकारे सुरू आहेत.चव्हाण यांनी अशीच एक गॅस दाहिनी कोल्हापुरात सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु सुरुवातील अधिकाºयांकडून तसेच पदाधिकाºयांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता; परंतु महापौर हसिना फरास, तत्कालिन उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन सादरीकरण पाहिले होते. महापालिका सभेत गॅस दाहिनी बसविण्याचा ठरावही झाला आहे.दोनच दिवसांपूर्वी चव्हाण यांनी ही गॅस दाहिनी कोल्हापूरला पाठविली असून ती पंचगंगा स्मशानभूमीत पूर्वी डिझेल दाहिनी बसविली होती तेथे ठेवण्यात आली आहे. उद्या, शुक्रवारपासून ही गॅस दाहिनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी बडोद्याहून तीन कारगीर येत आहेत. जोडकाम तसेच काही सिव्हील काम करण्यासाठी किमान आठ दिवस लागणार आहेत. त्यानंतर इलेक्ट्रीफिकेशनची कामे पूर्ण केली जातील. नवीन वर्षांत ही दाहिनी प्रत्यक्षात सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.विस्तारीकरणाची : गरजवाढत्या लोकसंख्येमुळे स्मशानभूमीत सुविधांची वाणवा असून, त्यामुळे नागरिकांना अत्यंसंस्कारावेळी वाट पहावी लागते. गॅसची दाहिनी बसविल्यानंतर ही अनेक कामे तातडीने करणे गरजे आहे. स्मशानभूमीत विकासकामे लवकरात लवकर सुरु करण्याची गरज आहे.